श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:50 IST2017-07-18T00:49:55+5:302017-07-18T00:50:31+5:30
नियोजन : बंद सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : सोमवार, दि. २४ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनास बंदोबस्ताचे वेगवेगळे नियोजन करावे लागते. यासाठी जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी केले आहे.
पोलीस ठाण्यात बंदोबस्त नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पालिका पदाधिकारी, नगरसेवक, पोलीसमित्र, जीवरक्षक तसेच त्र्यंबकचे पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तृप्ती धारणे होत्या. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सुनील अडसरे, नगरसेवक रवींद्र सोनवणे योगेश तुंगार, संतोष कदम, यशोदा अडसरे, शकुंतला वाटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदविला. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी बैठकीचा उद्देश सांगितला.
रवींद्र सोनवणे यांनी, श्रावण महिना आठ दिवसावर आला आहे. या पार्श्वभूमीवर बिल्वतीर्थावर संरक्षक कथडे देवस्थानने लावावेत तसेच धोक्याच्या सूचनांचा फलकदेखील लावावा, अशा सूचना मांडल्या. यावेळी देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांनी पोलिसांनी आम्हाला बॅरिकेट्स द्यावीत. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बिल्वतीर्थाची पाहणी व संरक्षक भिंत उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.वाहनांना प्रतिबंध घालण्याची मागणीनगरसेवक संतोष कदम यांनी वाहनतळ खंबाळे येथे न करता साधुग्राम येथे करावे. खंबाळेपासून परत त्र्यंबकेश्वर येथे येणे या द्राविडीप्राणायामापेक्षा अगोदर पालिकेचा वाहनतळ भरून मगच दुसऱ्या वाहनतळाचा विचार करावा. तसेच सिंहस्थात कार्यान्वित असलेले सीसीटीव्ही श्रावण महिन्यात पुनश्च सुरू करावेत, तर पंकज धारणे यांनी रिंगरोडने थेट त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूला काही वाहने रस्त्यावर उभे राहतात. अशा वाहनांना प्रतिबंध करावा.