अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:27 IST2018-08-25T17:26:54+5:302018-08-25T17:27:23+5:30

वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उपस्थित होते.

Meeting of the All India Mali Mahasangh | अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक

अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक

ठळक मुद्देमालेगाव : नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर

वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उपस्थित होते.
यावेळी येत्या काही महिन्यात घेण्यात येणाऱ्या माळी समाजचिंतन मेळाव्याविषयी चर्चा करण्यात आली. नासिक व धुळे जिल्ह्यातील समाज या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. समाजातील सर्व राजकीय नेते एका व्यासपीठावर बोलविणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
येत्या एप्रिल ते मे महिन्यात समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात येईल असे महासंघाचे विश्वस्त काठे यांनी सांगितले. यावेळी नासिक महानगरप्रमुखपदी विकास सोनावणे, सचिवपदी संतोष पुंड, महिला आघाडीपदी मंगला जाधव, कर्मचारी आघाडीपदी जितेंद्र खैरनार, प्रसिद्धी प्रमुखपदी समाधान शेवाळे तर मालेगाव तालुकाध्यपदी पिंटू साबळे, चांदवड तालुकाध्यक्षपदी समाधान गायकवाड, कळवण तालुकाध्यक्षपदी विनोद खैरनार, मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद बोरसे तर उर्वरित कार्यकारणीत भारत अहिरे, महेंद्र अहिरे, तुषार वाघ, योगेश अहिरराव, राजेंद्र खैरनार, योगेश लोंढे, विकास मंडळ, रमेश बच्छाव, सचिन सोनावणे यांची महासंघाच्या कार्यकारणीत निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाºयांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.मालेगावी अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

Web Title: Meeting of the All India Mali Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.