शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शहरात मध्यम तर गंगापूर धरण समुहात जोर ‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 18:58 IST

दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली

नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.१२) श्रावणसरींचा दमदार वर्षाव झाला. सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम राहिले. दुपारी एक वाजेपासून पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अशी हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.२ मि.मी इतका पाऊस शहरात मोजला गेला. नाशिकरोडपासून द्वारकापर्यंत दुपारी तीन ते पाच या वेळेत जोरदार पाऊस झाला.शहर व परिसरात गेल्या सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला होता. तत्पुर्वी गेल्या गुरुवारी पावसाने दिलासादायक हजेरी लावली होती. तेव्हा १३ मिमी इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली होती.बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरींचा वर्षाव सुरु झाला. दुपारी तीन वाजेपासून उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. पुढील दोन तास विहितगाव, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर या भागात जोरदार पाऊस झाला. सहा वाजेनंतर संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला होता. दिवसभर झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल होता. नाशिककरांना जोरदार संततधारेची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जुलैपाठोपाठ आगॅस्टमध्येही अद्याप मुसळधार पाऊ स झालेला नाही. अद्याप गोदावरी या हंगामात दुथडी भरून वाहताना नजरेस पडलेली नाही. गेल्या वर्षी गोदावरीला महापूर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला होता. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पूलाखालून केवळ ६४४ क्युसेक इतके पाणी रामकुंडात प्रवाहित होते. दरम्यान दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

गंगापूर समुहातील पर्जन्यमान (सकाळी ६ ते संध्या: ६ वाजेपर्यंत)गंगापूर : ३० मिमी.गौतमी-३२ मिमी.त्र्यंबकेश्वर-४३ मिमी.आंबोली-६७ मिमी.काश्यपी-१० मिमी.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिकRainपाऊस