नासर्डी नदीत आढळलेली कचऱ्याबरोबरच औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST2021-02-21T04:27:21+5:302021-02-21T04:27:21+5:30
याआधी निसर्गसेवक युवा मंचला अशाच प्रकारे गोदाकाठी औषधे आढळली होती. त्यानंतर शनिवारी (दि.२०) हा प्रकार दुसऱ्यांदा आढळला आहे. महापालिकेने ...

नासर्डी नदीत आढळलेली कचऱ्याबरोबरच औषधे
याआधी निसर्गसेवक युवा मंचला अशाच प्रकारे गोदाकाठी औषधे आढळली होती. त्यानंतर शनिवारी (दि.२०) हा प्रकार दुसऱ्यांदा आढळला आहे. महापालिकेने विविध संस्थांच्या मदतीने शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवून ब्लॅक स्पॉट नष्ट केले. मुंबई नाक्यापासून सातपूरपर्यंत विविध टप्प्यात ही मोहीम राबवली असतानाच आयटीआय पुलाजवळ अनेक औषधे आणि औषधी गोळ्यांचा साठा नासर्डी नदीपात्रात टाकून देण्यात आल्याचे आढळले. महापालिकेच्या वतीने जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आहे. मात्र त्यानंतरही जैविक कचरा अशा प्रकारे फेकण्यात येतो आणि महापालिका कोणतीही कारवाई करीत नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वच ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही, तक्रार केली तरच त्या ठिकाणी जाऊन कारवाई करता येते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी स्वत: या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी औषधे फेकणाऱ्या दुकानदार अथवा रुग्णालयांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी निसर्गसेवक युवा मंचचे अमित कुलकर्णी, वैभव देशमुख, वैशाली चव्हाण, रत्नाकर औटी, सुरेश शिरोडे यांनी केली आहे.
कोट...
जैविक कचरा फेकणाऱ्यांचा शोध सुरू असून परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक अशा दुकानदारांनादेखील याबाबत अवगत करण्यात येणार आहे. कचरा फेकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई आणि २५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापक
===Photopath===
200221\20nsk_29_20022021_13.jpg
===Caption===
आयटीआय पुलाजवळ सपडलेला जैवीक कचरा.