शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

वैद्यकीय अधिक्षकांना इंदिरा गांधी रुग्णालयात धक्काबुक्की; संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 13:58 IST

देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की

ठळक मुद्देशासकीय कामात अडथळा निर्माण केलापोलिसांनी रात्री घोडके याला अटक केली

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी कारंजा येथिल इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथीच्या रोगाचे काम करत असताना रुग्णालयात प्रवेश करून वैद्यकीय अधिक्षकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात द्वारका येथे राहणाऱ्या एका संघटनेचा पदाधिकारी असलेल्या संशयित मृणाल भालचंद्र घोडके (३३) याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय देवकर यांनी तक्रार दाखल केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजता इंदिरा गांधी रुग्णालयात ही घटना घडली. देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करुन रुग्णालयात आरडाओरड करत गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या घटनेनंतर देवकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री घोडके याला अटक केली आहे. घोडके हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिसArrestअटकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल