शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

मनमाडला वैद्यकीय अधिकारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:24 IST

मनमाड : शहरात शनिवारी (दि.२३) पुन्हा कोरोनाचे दोन रु ग्ण आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनमाड ग्रामीण रु ग्णालयात रुग्णांच्या घशातील स्वॉब घेणारे वैदद्यकीय अधिकारीच पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

मनमाड : शहरात शनिवारी (दि.२३) पुन्हा कोरोनाचे दोन रु ग्ण आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनमाड ग्रामीण रु ग्णालयात रुग्णांच्या घशातील स्वॉब घेणारे वैदद्यकीय अधिकारीच पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, त्यांच्या संपर्कात अनेक रुग्ण आले असल्याने धोका वाढला आहे. यापूर्वी रु ग्ण आढळलेल्या डॉ आंबेडकर चौकातील २३ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने या एकाच भागात एकाच कुटुंबात कोरोना रु ग्णांची संख्या चार झाली आहे. या पाशर््वभूमीवर शहरात पूर्वी प्रमाणेच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.--------------------------------------------बाधित रु ग्णाची पत्नी पॉझिटीव्हकसबे-सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधितांच्या संख्येत वाढ झाली असुन मुंबईहून गावी परतलेल्या कोरोना बाधित युवकाच्या पत्नीचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती कसबे-सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. मुंबई येथे बॅँकेत नोकरीस असलेला युवक गावी परतल्यानंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल गेल्या रविवारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे स्ॅब आरोग्य यंत्रणेने घेतले होते. यातील बाधिताच्या पत्नीचा चाचणी अहवाल पॉझीटिव्ह आला असून इतरांचे अहवाल प्रलंबित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मौजे सुकेणेत दुसरा बाधिताच्या रु ग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा व ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे.--------------------गुन्ह्यातील आरोपीस कोरोनाची बाधायेवला : तालुक्यातील कानडी येथील २४ वर्षीय तरूणाचा अहवाल शनिवारी (दि.२३) पॉझीटीव्ह आला आहे. या तरूणाच्या निमित्ताने तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. दोनच दिवसापूर्वी तालुका कोरोनामुक्त झाला होता. या तरूणाच्या पॉझीटीव्ह अहवालाने आरोग्यासह प्रशासनयंत्रणा पुन्हा गतिमान झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असणारा सदर तरूण जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडून येवला शहर पोलिस ठाण्याच्या कस्टडीत होता. चार दिवसांपूर्वीच सदर तरूणाचा स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, सदर संशयीत आरोपी तरूणास बाभुळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.------------सिन्नर तालुक्यात तीन पॉझिटिव्हसिन्नर: तालुक्यातील पांगरी येथील दांपत्यासह कणकोरी येथील बारा वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तीनही रुग्ण मुंबई येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. पांगरी येथील दांम्पत्य चेंबूर (मुंबई) येथील कंटेनमेंट झोनमधून पांगरी येथे आले होते. त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कणकोरी येथील १२ वर्षे मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुंबई येथील बेस्ट चालक यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा मुलगा त्याच्या कुटुंबातील आहे. सदर तीनही रुग्ण मुंबई येथून प्रवास केल्याचा इतिहास आहे. तालुक्यात एका दिवशी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या १२ झाली असून ५ जण कोरोनामुक्त झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक