वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १० जून पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:11+5:302021-05-20T04:16:11+5:30

कोविडच्या प्रभावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने वैद्यकीय विद्याशाखेची २ जूनची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली होती. ...

Medical examination from 10th June | वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १० जून पासून

वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १० जून पासून

कोविडच्या प्रभावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने वैद्यकीय विद्याशाखेची २ जूनची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परीक्षेची सुधारित तारीख केव्हा जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी (दि. १२) मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता येत्या १० पासून एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच. आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉर्डन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील काेरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असतांना परीक्षेची तारीखही जाहीर झाल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपस्थित व्हावे लागणार आहे.

दरम्यान, त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना कोविड बाबतचे आदेश दिले जाणार आहेत.

Web Title: Medical examination from 10th June