मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा
By Admin | Updated: January 21, 2016 22:42 IST2016-01-21T22:41:00+5:302016-01-21T22:42:26+5:30
मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा

मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा
नाशिकरोड : नाशिकरोड मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन व बिर्ला आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी विविध नेत्रविकार व मोतीबिंदू, काचबिंदू व लॅसिक या विषयावर झालेल्या कार्यशाळेत आयोजित व्याख्यान उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर लासुरे हे होते. यावेळी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. प्रशांत बिर्ला म्हणाले की, चष्म्याचा नंबर कमी करून रुग्णास चष्म्यापासून मुक्ती देण्यासाठी लॅसिक ही उपचार पद्धती अतिशय उपयुक्त आहे. मोतीबिंदू हा वयोपरत्वे होणारा निसर्गनिर्मित विकार असून, वेळीच लक्षात आल्यावर हा विकार कोणत्याही तऱ्हेच्या औषधोपचाराने आटोक्यात येत नाही. शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग असून, आधुनिक फेको मशिनद्वारे केली जाणारी अद्ययावत शस्त्रक्रिया ही जास्त फायदेशीर आहे. अत्याधुनिक प्रकारच्या लेन्समुळे रुग्णाला त्वरित फायदा मिळतो, असे डॉ. बिर्ला यांनी सांगितले. तसेच डॉ. निकाळे यांनी काचबिंदूबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अनिल गोसावी व आभार डॉ. अशोक निरगुडे यांनी मानले. यावेळी डॉ. अंबादास कुलकर्णी, डॉ. प्रकाश पुंड, डॉ. आसिफ तांबोळी, डॉ. राजेंद्र अमृतकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. लोहट, डॉ. महेश भालेराव, डॉ. गवळी, डॉ. अमित विसपुते, डॉ. राहुल कुटे, डॉ. अजित विसपुते आदि डॉक्टर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिकरोड मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनतर्फे विविध नेत्रविकार या कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना डॉ. समीर लासुरे. समवेत डॉ. प्रशांत बिर्ला, डॉ. राजेंद्र अमृतकर, डॉ. अशोक निरगुडे, डॉ. अनिल गोसावी आदि.