शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बलिप्रतिपदेच्या निमित्ताने पंचवटीत रेड्यांची मिरवणूक, स्वच्छतेचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 10:23 PM

बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्ताने गुरुवारी सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

नाशिक : बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्ताने गुरुवारी सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषतः पंचवटी परिसरात रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविक दुग्ध व्यवसायिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.सायंकाळी रेड्यांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिखित करण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेले विविध स्वच्छता अभियान, देवदेवतांचे चित्र, असे विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी दुग्ध व्यवसायिकांनी रेड्यांची सजावट करून पूजन व आरती केली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मिरवणूक सुरू झाली. नागचौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर रेडयांना मिरवणूक मार्गावर असलेल्या गंगाघाट, म्हसोबा महाराज, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड येथिल म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी नेले होते. मिरवणूकीच्या पुढे विद्युत रोषणाई केलेले चारचाकी वाहन व  ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून भाविक नाचत होते. यावेळी विविध आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंचवटी परिसरातील नागचौक, कृष्णनगर, सरदारचौक, जुना आडगाव नाका, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पेठरोड, दत्तनगर, नवनाथनगर, हिरावाडी, आडगाव, परिसरातील शेकडो दुग्ध व्यवसायिकांनी पंचवटीत बलिप्रतिपदा निमित्ताने रेडयांची सवाद्य मिरवणूक काढली होती.