पुढच्या आॅलिम्पिकमध्ये पदक निश्चित

By Admin | Updated: August 29, 2016 00:58 IST2016-08-29T00:52:49+5:302016-08-29T00:58:53+5:30

दत्तू भोकनळ : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेतर्फे सत्कार

Medal ensemble at the next Olympics | पुढच्या आॅलिम्पिकमध्ये पदक निश्चित

पुढच्या आॅलिम्पिकमध्ये पदक निश्चित

 नाशिक : सरावासाठी केवळ सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाल्याने देशाला पदक मिळवून देता आले नाही. मात्र २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये देशाला निश्चितच पदक मिळवून देईल, असा विश्वास नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांनी व्यक्त केला.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या गुणवंत गौरव सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. के. ब्रह्मे, डॉ. मो. स. गोसावी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनीषा राणे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आदि उपस्थित होते.
दरम्यान, याप्रसंगी दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी केले. परिचय राजश्री शौचे, प्रा. लक्ष्मीकांत भट, लिना चांदवडकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन पं. भूषण शुक्ल यांनी केले, तर आभार रत्नप्रभा गर्गे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Medal ensemble at the next Olympics