दुष्काळावर उपाययोजना
By Admin | Updated: June 9, 2015 01:52 IST2015-06-09T01:50:07+5:302015-06-09T01:52:48+5:30
दुष्काळप्रश्नी राज्यस्तरीय युवा कार्यशाळा उपक्रम :

दुष्काळावर उपाययोजना
नाशिक : बागलाण सेवा समिती व तेरे देस होम्स फ्रान्स संस्थेच्या वतीने १० ते १२ जून या कालावधीत तीनदिवसीय राज्यस्तरीय युवा कार्यकाळेचे आयोजन करण्यात आले असून, यात दुष्काळ व दुष्काळामुळे महिला व मुलांवर होणारे परिणाम आणि शाश्वत उपाययोजना या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स समोरील महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या प्रशिक्षण केंद्रात ही कार्यशाळा घेण्यात येणार असून, त्यात राज्यातील ६० युवक-युवतींचा समावेश राहणार आहे. दुष्काळामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, बेमोसमी हवामान, धोक्यात आलेली शेती व आर्थिक टंचाई यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्याने त्यावर विविध शासकीय योजनांचा आधार घेऊन उपाययोजना करता येऊ शकते, या विषयावर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. कार्यशाळेतून प्राप्त ज्ञानाचा वापर करून गाव पातळीवर गावकऱ्यांच्या मदतीने दुष्काळावर मात करणे त्यातून शक्य होईल. या कार्यशाळेस युवामित्र संस्थेचे सुनील पोटे, रोहयोचे अभ्यासक डॉ. प्रा. संजय साबळे हे मार्गदर्शन करतील.