ओझरच्या अपघात प्रवण क्षेत्रात उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 19:01 IST2020-08-09T19:01:09+5:302020-08-09T19:01:45+5:30
ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ओझरच्या अपघात प्रवण क्षेत्रात उपाययोजना
ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण सुरू झाल्या पासून महामार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. तर कित्येक जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गोष्टींची दखल घेत पिंपळगाव ओझर ट्रॅफिकच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व स्थानिक प्रशासन यांनी नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत यावर उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यास सांगितल्यानंतर याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरशाची सोय करण्यात आली आहे. याबद्दल प्रवाश्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.