नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात

By Admin | Updated: July 6, 2014 00:11 IST2014-07-05T22:43:50+5:302014-07-06T00:11:21+5:30

नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात

Mayor's election next week | नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात

नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात


नाशिक : महापौर व नगराध्यक्षांच्या निवडीला देण्यात आलेली मुदतवाढ मागे घेण्यात आल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाने यासंदर्भात काढलेल्या आदेशाची मुदत शनिवारी संपुष्टात आल्याने पुढच्या आठवड्यात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील भगूर, सटाणा, इगतपुरी, येवला, नांदगाव व मनमाड या सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची मुदत संपुष्टात आल्याने जिल्हा प्रशासनाने जून महिन्यातच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु तत्पूर्वीच राज्य सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे यासंदर्भातील राजकीय हालचाली थंडावल्या
होत्या.
आता मात्र न्यायालयाने कानउघाडणी करताच, सरकारने ही मुदतवाढ मागे घेतल्याने पुन्हा इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच शासनाचे जिल्हा प्रशासनाला आदेश प्राप्त होऊन ५ जुलैनंतर कधीही या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारनंतर या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
साधारणत: तीन दिवस अगोदर संबंधितांना त्याची नोटीस द्यावी लागते व त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी मुदत, त्याची छाननी, अपिलासाठी तीन दिवस, माघारीसाठीही एक दिवसाची मुदत द्यावी लागत असल्याने १४ जुलैनंतर निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Mayor's election next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.