महापौरांनी घेतली आयुक्तांची बाजू
By Admin | Updated: July 24, 2014 00:57 IST2014-07-24T00:00:57+5:302014-07-24T00:57:10+5:30
महापौरांनी घेतली आयुक्तांची बाजू

महापौरांनी घेतली आयुक्तांची बाजू
राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी महापौर अॅड. यतिन वाघ तेथे उपस्थित होते. आंदोलकांनी पूर्णवेळ आयुक्त नियुक्त करण्याचे निवेदन डॉ. संजीवकुमार यांना दिले. तेव्हा, ‘याचे काय करू?’ असा प्रश्न त्यांनी केला. महापौर वाघ यांनीही, सदरचे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केले पाहिजे, असे मत नोंदविले. तेव्हा सुजाता डेरे यांनी पालिकेचे कामकाज रोखण्याचा आमचा उद्देश नाही, असे नमूद केले. त्याचवेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आणि पदाधिकारी उठून गेले. पालिकेत कामे ठप्प झाल्याचा इन्कार आयुक्त डॉ. संजीवकुमार करीत असताना, महापौरांनीदेखील अंदाजपत्रक आताच संमत झाल्याचे कारण दिल्याने महापौर आयुक्तांची वकिली का करतात, असा प्रश्न मनसेच्या नगरसेवकांनी आपसात उपस्थित केला.