ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

By Admin | Updated: September 12, 2015 23:31 IST2015-09-12T23:29:26+5:302015-09-12T23:31:16+5:30

ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

Mayor of Thackeray family visits | ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

सिडको : येथील तानाजी चौकात राहणाऱ्या नेहा ठाकरे या बालिकेचा घंटागाडीच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. महापौर अशोक मुर्तडक यांनी ठाकरे कुटुंबीयांंच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.
सिडकोतील प्रभाग क्रमांक ४३ मध्ये राहणाऱ्या नेहा ठाकरे या बालिकेला गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना घराजवळच घंटागाडीने धडक दिली. यात नेहाच्या डोक्यास जबर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दिवसभर शोकाकुल वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या रहिवाशांबरोबरच राजकीय नेत्यांनीही लगेचच याबाबत आवाज उठविला व घंटागाडी चालकाबरोबरच ठेकेदारावरही कारवाई करावी, तसेच मयत नेहाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी यासाठी पुढाकार घेतला. मयत नेहाचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाम येथे करण्यात
आला.
मयत नेहाचे वडील जिजाबराव ठाकरे हे टेम्पो चालवून उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने नेहाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अ‍ॅड. अरविंद शेळके, कल्पना चुंभळे, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील यांसह सर्वच पक्षांचे नगरसेवक राजकीय नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. दरम्यान, अद्यापपर्यंत त्यांना कोणतीही मदत मिळाली नसली तरी आम्हाला न्याय मिळावा, अशीच विनंती मयत नेहाचे वडील जिजाबराव ठाकरे यांनी केली आहे. (वार्ताहर)


''सिडको भागातील अंतर्गत रस्त्यालगत नागरी वसाहत आहे. यामुळे या रस्त्यांवरून नागरिकांचा कचरा गोळा करण्यासाठी सध्या जी घंटागाडी आहे, ती मोठी पडते. यामुळे आगामी काळात सिडकोतील अंतर्गत रस्त्यांसाठी लहान आकाराची घंटागाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.- अशोक मुर्तडक, महापौर

Web Title: Mayor of Thackeray family visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.