शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शिक्षकांचे महापौरांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:41 IST

महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, महापौरांनी २३ पैकी १९ मागण्या मान्य करत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना दिले. दरम्यान, शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

नाशिक : महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, महापौरांनी २३ पैकी १९ मागण्या मान्य करत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना दिले. दरम्यान, शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.  महापालिका प्राथमिक शिक्षक राज्यस्तरीय संघटनांची समन्वय समितीचे पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन त्यांना २३ मागण्यांसंबंधी निवेदन दिले. यावेळी महापौरांनी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना पाचारण करत पदाधिकाºयांसमवेत बैठक घेतली. यावेळी, २३ पैकी १९ मागण्यांबाबत महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यात प्रामुख्याने, मनपात १२ वर्षे सलग सेवा झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे, २४ वर्षे सलग सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठतेने विषयनिहाय याद्या तयार करून त्या प्रसिद्ध करणे, जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया शिक्षकांसंदर्भात शासननिर्णयाची अंमलबजावणी करणे, सहाव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे, दरमहा वेतनस्लिपा नियमित मिळणे, नजरचुकीने वेतनवाढ बाकी राहिलेल्या शिक्षकांना वेतनवाढ देणे, अनु.जमाती  विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळणे, मनपा शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने  शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी करणे, संचमान्यतेनुसार तातडीने शिक्षकांचे आॅनलाइन समायोजन करणे, सर्व शिक्षकांच्या वारसांची नोंद सेवापुस्तकात करणे, विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानातून प्रवेशावेळीच गणवेश मिळणे आदी मागण्यांचा समावेश होता. बैठकीला, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सुनील खेलूकर, बाळासाहेब कडलग, राजेश दाभाडे, संजय बच्छाव, दीपक पगार, सचिन चिखले, सुरेश खांडबहाले, विठ्ठल नागरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTeacherशिक्षक