कोरोना वाढीस महापौर, पालकमंत्री जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:28+5:302021-04-23T04:16:28+5:30
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णवाढीत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याला कारणीभूत महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब ...

कोरोना वाढीस महापौर, पालकमंत्री जबाबदार
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णवाढीत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याला कारणीभूत महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि घनकचरा व्यवस्थापक डॉ. कल्पना कुटे आहेत. प्रशासनाचा त्यांच्यावर कोणताही अंकुश नाही. डॉ. कुटे यांचे नियमानुसार शिक्षण नसताना त्या आरोग्याधिकारी पदावर कार्यरत आहेत. या दोघांना तत्काळ निलंबित करावे. कोविडसाठी दिलेल्या संपूर्ण निधीचे व खर्चाचे ऑडिट करावे तसेच अतिरिक्त आयुक्त अष्टीकर हे नियुक्तीनंतरही काही दिवस कामावर हजर झाले नाहीत. त्यांचीही चौकशी करावी. अनेक अधिकारी कोरोना झालेला नसताना रजेवर गेलेले आहेत. त्यांचीही चौकशी करावी. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटना चौकशीसाठी जी चौकशी समिती नेमलेली आहे. त्यात स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश करू नये. बाहेरील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
इन्फो===
पालकमंत्री छगन भुजबळ आणि नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नाकर्तेपणामुळे आणि नियोजनाअभावी संपूर्ण जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यामुळेच नाशिक देशभरात आघाडीवर आहे. प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. रेमडेसिवर इंजेक्शन मिळत नाही. रुग्णालयात बेड मिळत नाही. खासगी रुग्णालये शासनाच्या निर्देशापेक्षा जास्त बिले आकारून लूट करत आहेत. शासनाने नेमलेले ऑडिटर मिलीभगत करून कोणतीही बिले तपासली जात नाहीत. असा सर्व अनागोंदी कारभार आणि लूटमार नाशिक शहर व जिल्ह्यात सुरू असल्याचा गंभीर आरोप दिनकर पाटील यांनी केला आहे.
इन्फो===
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविण्यासाठी ठेकेदाराला टेंडर देण्यावरून आणि आर्थिक देवाणघेवाणीतून घातपात झाला आहे. कोणताही अनुभव नसलेल्या ठेकेदाराला चुकीच्या पद्धतीने ठेका देण्यात आला आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.