महापौरांनी दिले घुबडाला जीवनदान

By Admin | Updated: February 13, 2016 00:03 IST2016-02-13T00:03:12+5:302016-02-13T00:03:24+5:30

महापौरांनी दिले घुबडाला जीवनदान

Mayor gave Owl life | महापौरांनी दिले घुबडाला जीवनदान

महापौरांनी दिले घुबडाला जीवनदान

नाशिक : महापौर अशोक मुर्तडक यांचे पक्षी-प्राणिप्रेम सर्वश्रुत आहे. पंचवटीतील आपल्या निवासस्थानासमोर असलेल्या एका झाडावर पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या घुबडाची सुटका करत महापौरांनी त्याला जीवनदान दिले.
पंचवटीतील महापौरांच्या निवासस्थानासमोर एका झाडावर एक घुबड पतंगाच्या मांज्यात अडकून पडल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. महापौरांनी स्वत: शिडीच्या साहाय्याने झाडावर चढून घुबडाची पतंगाच्या मांजापासून सुटका केली. पतंगाच्या मांजात अडकून पडल्याने घाबरलेल्या घुबडाची सुश्रुषा करत महापौरांनी त्याला दोन दिवसांपासून आपल्या निवासस्थानात ठेवले. आता पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने यांच्याकडे घुबड सोपविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. नायलॉन मांजाला बंदी असूनही शहरात पतंगबाजीसाठी सर्रास वापर झाला. नायलॉनचे मांजे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत असून, पतंग उडविण्यासाठी त्याचा उपयोग न करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor gave Owl life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.