सातपूरला युवतीचा विनयभंग
By Admin | Updated: March 25, 2017 16:47 IST2017-03-25T16:47:33+5:302017-03-25T16:47:33+5:30
प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या युवतीस प्रियकराने मोबाइलवर शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना

सातपूरला युवतीचा विनयभंग
नाशिक : प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या युवतीस प्रियकराने मोबाइलवर शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर परिसरात घडली आहे़ याप्रकरणी संशयित समीर संतोष जोशी (रा.आयटीआय सिग्नल, सातपुर) विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यात २२ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित जोशीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते़ मात्र यापुढे हे संबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्याने संशयित जोशी याने तरुणीच्या वडिलांच्या समक्ष व मोबाइलवर शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे़