‘मातोश्री’ने जपला सामाजिक वसा

By Admin | Updated: October 20, 2015 21:17 IST2015-10-20T21:09:30+5:302015-10-20T21:17:45+5:30

‘मातोश्री’ने जपला सामाजिक वसा

'Matoshree' confers social fat | ‘मातोश्री’ने जपला सामाजिक वसा

‘मातोश्री’ने जपला सामाजिक वसा

नाशिक : अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक येथील मातोश्री अभियांत्रिकी शिक्षण संस्थेने अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून दोन लाख तीन हजार रुपयांचा निधी नाम फाउंडेशनकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव कुणाल दराडे, प्राचार्य गजानन खराटे, डॉ. वर्षा पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य संजय बागुल, प्रा. शैलेंद्र शुक्ला, प्रा. नीलेश घुगे आदि उपस्थित होते. संस्थेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला आहे. त्यासाठी मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातून दीड लाख रुपये, तर मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निकमधून ५३ हजार रुपयांचा निधी जमा झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: 'Matoshree' confers social fat