पक्षीय समीकरणात विजयाचे गणित कठीण

By Admin | Updated: February 14, 2017 01:44 IST2017-02-14T01:44:12+5:302017-02-14T01:44:29+5:30

प्रभागाची व्याप्ती मोठी : सहा आजी-माजी नगरसेवकांचे नशीब ठरणार

Mathematics difficult to achieve in favor of party equation | पक्षीय समीकरणात विजयाचे गणित कठीण

पक्षीय समीकरणात विजयाचे गणित कठीण

मनोज मालपाणी : नाशिकरोड
चेहेडी सिन्नरफाटा- गोरेवाडी - चाडेगाव या प्रभाग १९ मध्ये तीनच गटांचे आरक्षण असून, प्रभागाची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवारांचे मोठ पीक आले असले आहे. सहा आजी-माजी नगरसेवक नशीब अजमावत असून, मनसेचे पॅनल अपूर्ण आहे. शिवसेना, भाजपा, मनसे, आघाडी, भारतीय संग्राम परिषदेची आघाडी, इतर पक्ष व अपक्ष यामुळे विजयाचे गणित सोडविणे अवघड होऊन बसले आहे. चेहेडी, चाडेगाव गावठाण, गोरेवाडी, सिन्नरफाटा झोपडपट्टी परिसर, मळे विभाग, चेहेडी पंपिंगचा कॉलनी भाग असा संमिश्र भागांचा व लोकवस्तीचा असलेला प्रभाग १९ची व्याप्ती मोठी आहे. असे असतानाही या ठिकाणी तीनच आरक्षणे पडली आहेत.  अ-अनुसूचित गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक संतोष साळवे, भाजपा नगरसेवक कन्हैया साळवे, राष्ट्रवादीतुन नुकतेच संभाजी ब्रिगेडवासी झालेले नगरसेवक हरिष भडांगे, मनसे - विनायक पगारे, कॉँग्रेस - संदीप काकळीज, रिपाइं आठवले गट सुनील संपत कांबळे, भारतीय संग्राम परिषद पॅनलचे संतोष वाक््चौरे, बसपा - संतोष जाधव, अपक्ष - संतोष रंजन कांबळेसह एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवारांची आपापल्या भागातील ताकद ही त्यांची जमेची बाजू  आहे. मात्र संबंधित उमेदवार इतर भागांतून किती मतदान मिळवेल यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.  संतोष साळवे, कन्हैया साळवे, हरिष भडांगे हे तीन आजी-माजी नगरसेवक आमने-सामने असल्याने चुरस वाढली आहे.  ब-इतर मागासवर्ग महिला गटात शिवसेना - जयश्री नितीन खर्जुल, भाजपा - नंदा वामन भोर, राष्ट्रवादीच्या नगरसेवक शोभा आवारे, भारतीय संग्राम परिषद पॅनलच्या प्राजक्ता सचिन अहेर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या छाया सचिन गांगुर्डे हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.  शिवसेनेकडून व आमदार योगेश घोलपांचे समर्थक योगेश भोर यांना उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश करून आई नंदा भोर यांना उमेदवारी मिळविली, तर खासदार हेमंत गोडसे यांच्या गटाचे नितीन खर्जुल यांच्या पत्नी जयश्री खर्जुल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या गटात मनसेच्या अधिकृत उमेदवार महिलेने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. या गटात सहकारी उमेदवारांकडून होणारी मदत या गटातील उमेदवारांचा विजयाचा मार्ग ठरविणार आहे. क-सर्वसाधारण गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे, भाजपा- पंडित आवारे, मनसे- सचिन चव्हाण, राष्ट्रवादी- विकी खेलूकर,  भारतीय संग्राम परिषदेकडून माजी नगरसेवक शिवा भागवत, कॉँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अपक्ष- किरण लोखंडे, बसपा- हनीफ शेख, एमआयएम- बापू सोनवणे व अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या गटातदेखील विभागनिहाय उमेदवारांचे प्राबल्य आहे. माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे, शिवा भागवत आमने-सामने नशीब आजमावत आहे.

Web Title: Mathematics difficult to achieve in favor of party equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.