राज्यातील माथाडी कामगारांचा बुधवारी लाक्षणिक बंद

By Admin | Updated: May 25, 2014 16:30 IST2014-05-25T16:26:01+5:302014-05-25T16:30:30+5:30

नाशिक : शासन दरबारी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने बुधवारी (द़ २८) लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली़

The Mathadi workers in the state closed on Wednesday | राज्यातील माथाडी कामगारांचा बुधवारी लाक्षणिक बंद

राज्यातील माथाडी कामगारांचा बुधवारी लाक्षणिक बंद

नाशिक : शासन दरबारी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने बुधवारी (द़ २८) लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली़
मुंबईच्या माथाडी भवन येथे झालेल्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, नगर यासह इतर जिल्‘ांतील माथाडी घरकुले मिळावीत, मंडळाने निश्चित केलेले मजुरीचे दर मिळावेत, लेव्ही वसूल करणे, कामगारांना किमान वेतन मिळावे, बाजार समितीतील माथाडी कामगारांना किमान वेतन, हक्काची कामे मिळावीत यासह विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत़ या मागण्या तत्काळ मार्गी लागाव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़

Web Title: The Mathadi workers in the state closed on Wednesday