मोरे विरुद्ध बनकर यांच्यात सामना

By Admin | Updated: March 31, 2016 23:06 IST2016-03-31T23:05:28+5:302016-03-31T23:06:34+5:30

पिंपळगाव बसवंत सोसायटी निवडणूक

The match between More vs Baker | मोरे विरुद्ध बनकर यांच्यात सामना

मोरे विरुद्ध बनकर यांच्यात सामना



पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोरे विरुद्ध बनकर असा सामना रंगणार आहे.
पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १० एप्रिल रोजी होत असून, १२७९ मतदार आहेत. सत्ता बनकर यांच्या हाती का मोरेंच्या हाती
द्यायची यामध्ये चुरस आहे. भास्करराव बनकर व दिलीप बनकर यांचे
शेतकरी विकास पॅनल तर सतीश मोरे व दिलीप मोरे यांच्या सहकार पॅनलमध्ये लढत
होणार आहे. संचालक पदासाठी २६ उमेदवार उभे असून, काही जागांची लढत ही चुरशीची होणार
आहे. ओबीसी गटात सुरेश बोडे विरुद्ध सतीश मोरे ही लढतही
अत्यंत चुरशीची होणार आहे.
पुढील दहा दिवस पिंपळगावचे राजकारण ढवळून निघणार असून, कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या सोसायटीवर कोणाची सत्ता येते
याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले
आहे. मोरे विरुद्ध बनकर अशी सरळ लढतच होणार असून, दोन्ही
पॅनलचे नेते विजयासाठी प्रयत्न करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: The match between More vs Baker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.