शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 17:55 IST

‘गुरु जी, तुमच्या खिचडीच्या खात्यात एक रु पया जमा झाला काय? तेवढे बघा अन् लागलीच कळवा...’ असा संदेश मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर आला आणि जो तो आपल्या खात्यातील माहिती घेण्यासाठी बॅँकेत धाव घेऊन खातरजमा करताना दिसून आला. या एक रुपयाच्या संदेशामुळे बागलाण तालुक्यातील गुरुजींची दमछाक तर झालीच शिवाय नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

त्याचे झाले असे की, माध्यमिक प्राथमिक ,अंगणवाडी अशा शासनस्तरावरील विविध शैक्षणिक शाखांतून पोषणआहार दिला जातो. यासाठी शासन अनुदानही देते. हे अनुदान तालुक्याच्या पंचायत समितीकडून दिले जायचे. मात्र हा निधी प्राप्त व्हायला बराचसा कालावधी जायचा. अनेक समस्या निर्माण व्हायच्या. त्यामुळे ही योजना व गुरु जी अडचणीत यायचे. या अडचणी येऊ नयेत म्हणून सदर निधी वेळेत पोहोचावा यासाठी आता थेट केंन्द्रस्तरावरु न मुख्याध्यापक बँक खात्यावर वर्ग होणार आहे. मग पूर्वीचे हे बॅँक खाते बरोबर आहे काय? यासाठी खात्री व्हावी म्हणून केंद्रियस्तरावरु न एक रु पया या खात्यावर टाकून अधिकारीवर्ग हे खाते सुरु  आहे की नाही याची  प्रायोगिक तत्वावर खात्री करीत आहेत. यासाठी प्रत्येक मुख्याध्यापकांच्या खात्यावर एक रु पया टाकलेला आहे. खात्यावर एक रु पया आला का त्याच्या शोधार्थ जिल्हाभरातील गुरु जी धावपळीत दिसत आहेत. यासाठी खेड्यापाड्यावरील गुरुजी महागाईत भाववाढ झालेले पेट्रोल जाळून विद्यार्थांचा अभ्यास बुडवून ‘एक रु पया’ शोधायला. गुरु जी बँकेत पोचले तर तिथे गुरु जीच गुरु जी, जो तो एकमेकाला ‘तुमचा एक रु पया सापडला काय?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत. ज्याचा एक रु पया सापडला तो विजयी मुद्रेत इतरांना ‘माझा एक रु पया सापडला. माझे खाते बरोबर आहे’ असे सांगत असून ज्याचा सापडला नाही तो मात्र एक रु पया हरवल्याच्या विवंचनेत दिसत होता. एक रु पया शोधण्यास गेलेल्या गुरुजींना पाहून मुले खेळताना म्हणत होते...गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा