शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

केळझर कालव्यास प्रचंड पाणी गळती शेतकर्यांचे लाखो रु पयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:38 IST

डांगसौंदाणे वार्ताहर: पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे केळझर धरण कालव्यास दगडी साकोडे,डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती झाल्याने अनेक गावातील असंख्य शेतकर्यांच्या शेतमालाचे व शेतीचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी केळझर धरणावर धडक देत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देसंतप्त शेतकर्यांची केळझर धरणावर धडक, कालव्याचे पाणी बंद करण्यास भाग पाडले

डांगसौंदाणे वार्ताहर: पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे केळझर धरण कालव्यास दगडी साकोडे,डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती झाल्याने अनेक गावातील असंख्य शेतकर्यांच्या शेतमालाचे व शेतीचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी केळझर धरणावर धडक देत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने वाहून जाणारे पूर पाणी केळझर कालव्यात टाकून पुढे चारी क्र .? मध्ये टाकण्याची चाचणी घेण्यासाठी सोडण्यात आले होते मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी कालवा दुरु स्त न करताच पूर पाणी कालव्यात टाकल्याने दगडी साकोडे, डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती होऊन शेती व लाखो रु पयांच्या शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच बागलाण चे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली होती व शेतकर्यांचे नुकसान झाल्याने कालवा दुरु स्त होईपर्यंत शेतकर्याना दिलासा द्यावा अश्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या होत्या. मात्र आमदारांच्या सूचना धुडकावत पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी बंद न केल्याने शेतकरी आक्र मक झाले होते. दगडी साकोडे येथे कालव्याच्या गळतीचे प्रमाण जास्त असून दुरु स्तीचे टेंडर निघूनही काम संथगतीने सुरू असून काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे,जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे केली असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी हेमंत चंद्रात्रे,मनोहर सोनवणे, दशरथ बागुल, अर्जुन भोये,शंकर बिहरम, हिरामण सोनवणे, जनक सोनवणे, यशवंत गांगुर्डे यांच्या सह डांगसौंदाणे, साकोडे, गव्हाणेपाडा गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस