शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

गोल्फ क्लब मैदानावर आज महाआरोग्य शिबिर

By admin | Updated: December 31, 2016 23:45 IST

तयारी पूर्ण : पालकमंत्र्यांचे शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गोल्फ क्लब मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तयारीची शिबिराच्या पूर्वसंध्येला पाहणी केली. पालकमंत्र्यांनी स्वयंसेवकांना तसेच कृती समित्यांच्या प्रमुखांसह कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना नियोजनानुसार जबाबदारी पार पाडीत शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच शिबिरासाठी उपस्थित डॉक्टरांशीही विचारविनिमय केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तयारीची पाहणी करताना उपस्थित स्वयंसेवक तथा कृती समिती प्रमुखांशी संवाद साधला. शिबिरासंदर्भात असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेत कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. नाशिक शहराने ज्याप्रमाणे कुंभमेळा यशस्वी करून दाखवला त्याचप्रमाणे हा आरोग्याचा महाकुंभही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करताना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो रुग्णांच्या आजारांचे निदान व त्यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने हा कीर्तिमान ठरणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देऊन त्यांच्या आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिरात सहभागी स्वयंसेवक व डॉक्टरांना सर्व सुविधा तसेच जेवण व पाणी जागेवर मिळणार असून, शिबिराच्या वेळेत कोणीही आपले स्थान सोडून रुग्णांची गैरसोय होऊ देऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, शिबिराचे मुख्य समन्वयक रामेश्वर नाईक, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, वसंत गिते, सुनील बागुल, डॉ. प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, मिलिंद शंभरकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते. दरम्यान, आतापर्यंत ५० हजारहून अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली असून, अनेकांची प्राथमिक नोंदणीही करण्यात आली आहे. या सर्वांना नोंदणी केंद्रावर नोंद करून शिबिरात उपचार घेता येणार असून, शिबिरात हृदयरोग, किडनीचे आजार, मेंदू विकार, कॅन्सर, गर्भाशय, बालरोग आदि आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)