शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मसाला विक्रेत्यांचे हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:12 AM

बोहरपट्टीतील सरकारवाड्याला खेटून पसारा मांडून बसणाºया मसाला विक्रेत्यांना हटविण्यात येणार असून, सदर विक्रेत्यांचे स्थलांतर गोदाघाटावरील नारोशंकर मंदिराच्या समोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील जागेत करण्यात येणार आहे. मसाला विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर पुन्हा बोहरपट्टीत अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने आपले पथक तैनात ठेवणार आहे.

नाशिक : बोहरपट्टीतील सरकारवाड्याला खेटून पसारा मांडून बसणाºया मसाला विक्रेत्यांना हटविण्यात येणार असून, सदर विक्रेत्यांचे स्थलांतर गोदाघाटावरील नारोशंकर मंदिराच्या समोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील जागेत करण्यात येणार आहे. मसाला विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर पुन्हा बोहरपट्टीत अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने आपले पथक तैनात ठेवणार आहे.  बोहरपट्टीतील रस्ता आधीच अरुंद, त्यात दोन्ही बाजूंना भाजीविक्रेत्यांसह मसाला विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे दोन्ही बाजूने वाहने जाणे अवघड होऊन बसले आहे. त्यात वाहतूक कोंडी होऊन वादविवादाचेही प्रसंग घडत असतात. बोहरपट्टीतील मसाला विक्रेत्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, विक्रेते दाद देत नव्हते. विक्रेत्यांनी उपोषणाचीही तयारी चालविली होती. परंतु, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी सदर विक्रेत्यांना  वस्तुस्थिती समजून सांगितली आणि हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर न केल्यास अतिक्रमणविरोधी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. चर्चेच्या फेºयांनंतर विक्रेत्यांनी नारोशंकराच्या मंदिरासमोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील पार्किंगच्या जागेत स्थलांतर करण्यास संमती दिली. त्यानुसार, विभागीय अधिकाºयांनी तातडीने मंगळवारी (दि.१९) रात्रीच सोडत काढली आणि १७ विक्रेत्यांचे हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. हॉकर्स झोनमध्ये प्रत्येकाला ५ बाय ५ ची जागा देऊन त्यानुसार आखणी करून देण्यात आली असून मसाला विक्रेत्यांनी स्थलांतर केल्यास बोहरपट्टीतील रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.२०) सकाळी काही वेळ विक्रेत्यांनी नव्या जागेत व्यवसाय थाटला परंतु, नंतर तेथे सोयीसुविधा नसल्याचे कारण देत पुन्हा बोहरपट्टीत ठाण मांडले. त्यामुळे, विभागीय अधिकाºयांनी कोणत्याही स्थितीत बोहरपट्टीत विक्रेत्यांना बसू न देण्याचा निर्णय घेतला असून कारवाईचा इशारा दिला आहे.बोहरपट्टीतील १७ मसाला विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. एक वाहनासह कर्मचाºयांचे पथक त्याठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. बोहरपट्टीत अतिक्रमण करणाºया अन्य विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पश्चिम विभागात एकूण २७ हॉकर्स झोन असून, टप्प्याटप्प्याने विक्रेत्यांना त्याठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना आहे.- नितीन नेर, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार