नगरसूल-येवला रस्त्यावर मारु ती व्हॅनला अपघात

By Admin | Updated: October 23, 2015 22:08 IST2015-10-23T22:06:53+5:302015-10-23T22:08:06+5:30

नगरसूल-येवला रस्त्यावर मारु ती व्हॅनला अपघात

Maru Van accidents on the Municipal-Yeola road | नगरसूल-येवला रस्त्यावर मारु ती व्हॅनला अपघात

नगरसूल-येवला रस्त्यावर मारु ती व्हॅनला अपघात

येवला : नगरसूल-येवला रस्त्यावर भरधाव वेगात असलेली मारुती व्हॅन (एमएच २३ सी- १२७३) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्डय़ात उलटून अपघात झाला.
या अपघातात वाहनाचा चालक जखमी झाला असून, भरधाव वेगात वाहन चालवणार्‍या या चालकावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
शिर्डीला जाण्यासाठी दक्षिण भारतातून येणार्‍या साईभक्तांना ने-आण करण्यासाठी नगरसूल-येवला रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहने भरधाव वेगात धावत असतात. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
या चालकांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने वेगाची र्मयादा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांचा जीव धोक्यात पडत आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर मारुती व्हॅनचा चालक जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून
गेल्याचे ग्रामस्थांनी सागितले.
सुसाट वेगाने वाहन चालवणार्‍या या वाहनचालकांमुळे ग्रामस्थांच्या जिवाला
धोका असल्याने या वाहनचालकावर पोलिसांनी करवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Maru Van accidents on the Municipal-Yeola road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.