शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव नाशकात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:12 IST

नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देसायंकाळी पाच वाजता निघणार अंत्ययात्रा गोदाकाठी नाशिक अमरधाममध्ये होणार अंत्यसंस्कार

नाशिक : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले.

नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. भालेराव हे कोब्रा बटालयिन-२०६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. भालेराव हे मूळ निफाड तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी आहेत. सध्या ते नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्यास होते. सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला भागात कोब्रा बटालियन गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी शनिवारी (दि.२८) रात्री स्फोट घडवून आणला. या स्फोटात भालेराव यांच्यासह इतर दहा कमांडोदेखील जखमी झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र पहाटे साडेतीन वाजता भालेराव त्यांची उपचारापुर्वीच प्राणज्योत मालवली.

२००८ मध्ये सैन्यात दाखल झालेले भालेराव हे २०१० पासून कोबरा बटालियनमध्ये सहायक कमांडंट पदावर कार्यरत होते. कोबरा बटालियन-२०६ जे अधिकारी असलेले भालेराव हे जवानांसोबत अभियानावरून परतत असताना नक्षली हल्ला झाला. रात्रीच्या सुमारास परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या ॲम्बुशमध्ये जवान अडकले यावेळी हा स्फोट घडवून आणला गेला. पिपल गुरील्ला आर्मी मोहीम दोन डिसेंबरपासून सुरू होणारा आहे. या पार्श्वभूमीवर माअ‍ोवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची बोलले जात आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण केलीपालकमंत्री छगन भुजबळ यांनी वीरजवान नितीन भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण केली. माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला अशा शब्दात त्यांनी शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हीरे यांनी राजीवनगर येथे भालेराव कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

टॅग्स :Nashikनाशिकnaxaliteनक्षलवादीMartyrशहीद