विवाहितेचा विनयभंग करून पतीस मारहाण
By Admin | Updated: October 24, 2015 23:31 IST2015-10-24T23:30:24+5:302015-10-24T23:31:17+5:30
विवाहितेचा विनयभंग करून पतीस मारहाण

विवाहितेचा विनयभंग करून पतीस मारहाण
नाशिक : दुचाकीने जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे. दरम्यान, या विवाहितेने पतीकडे तक्रार केल्यानंतर पतीने संशयितांना बोलावून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी मारहाण केल्याची फिर्याद जेलरोडवरील पीडित दाम्पत्याने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़
जेलरोड परिसरातील विवाहिता शुक्रवारी सीबीएसकडे जात असताना संशयित उमेश लोखंडे (रा़ जेलरोड) याने पाठलाग करून विनयभंग केला़ या प्रकरणाची तक्रार विवाहितेने पतीकडे केल्यानंतर पतीने संशयित उमेश लोखंडे, त्याचे वडील व आई यांना बोलावून तक्रार केली असता संशयितांनीच विवाहिता व तिच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण केली अशी तक्रार आहे. (प्रतिनिधी)