सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST2021-05-14T04:14:22+5:302021-05-14T04:14:22+5:30
नाशिक : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नाशिक : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक, मानसिक छळ करत तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आाडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुनील कुऱ्हाडे, नाना कुऱ्हाडे, सवडूबाई कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, चंद्रकला गायकवाड, शशिकला शिंदे (रा. जनार्दन स्वामी नगर, नांदूर नाका) यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी कुऱ्हाडे (२४) या विवाहितेने मंगळवारी (दि. ११) आपल्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.