मारहाणीत पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा

By Admin | Updated: September 20, 2015 22:49 IST2015-09-20T22:49:03+5:302015-09-20T22:49:49+5:30

मारहाणीत पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा

Married wife's murder; Offense against husband | मारहाणीत पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा

मारहाणीत पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा

मालेगाव : कॅम्पातील चर्चमागे बेनीवाल कॉर्नरजवळ काल रात्री व्यसनाधीन असलेल्या सेवानिवृत्त वायरमनने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून, कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कंधाणेतील मुळचा राहणारा नानाजी चिंधा थोरकर (६०) हा मालेगावी वीज वितरण कंपनीत नोकरीस असल्याने मालेगावी राहावयास आला होता. त्याने स्वेच्छेने राजीनामा देऊन मुलाला नोकरीस लावले होते. मुलगा जुना पॉवर हाऊस येथे सध्या वास्तव्यास आहे. नानाजी थोरकर याची पत्नी रेश्माबाई (५४) व घटस्फोटित मुलगी यांचेसमवेत कॅम्प चर्चमागे राहतो. काल रात्री पत्नी रेश्माबाई बरोबर त्याचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी नानाजीने लाकडी दांंडक्याने पत्नीस बेदम मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच रेश्माबाईचे भाऊ व माहेरच्या लोकांनी धाव घेतली. थोरकर नशेत असल्याने पत्नीला मरेपर्यंत मारहाण करून जीवे ठार मारले. शवविच्छेदन अहवालानंतर कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Married wife's murder; Offense against husband