सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ
By Admin | Updated: September 5, 2016 00:56 IST2016-09-05T00:49:10+5:302016-09-05T00:56:24+5:30
बाजारपेठगणरायाचे आगमन : रंगीबेरंगी माळा, चक्र यांना मागणी

सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ
नाशिक : धावपळीचे जीवन आणि सण साजरे करताना एकमेकांशी लागलेली स्पर्धा यामुळे एकेकाळी स्वत: राबून तयार केली जाणारी गणेशोत्सवाची सजावट हल्ली रेडिमेड वस्तूंद्वारे केली जात आहे. यामुळे कल्पकतेने, नैसर्गिक साहित्य वापरून केलेली जिवंत सजावट हल्ली कृत्रिम वाटू लागली आहे. जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मागणी आहे. या कृत्रिम सजावटीलाच जास्त महत्त्व दिले जात असल्याने त्याची बाजारपेठ सध्या जोरात चलती सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वस्तूंच्या दरात १० टक्के भाववाढ झाली असल्याची माहिती विक्रेते अर्जुन पवार यांनी दिली. आराससाठी जसे साहित्यांमध्ये वैविध्य दिसत आहे तसेच वैविध्य गणरायाच्या अलंकारांमध्येही दिसत असून, सोने, चांदी, इतर धातू, खडे, आॅक्साईड आदि प्रकारांतले वैविध्यपूर्ण दागिने बाजारात दाखल झाले आहेत.