दीपावलीनिमित्त बाजारपेठ गजबजली
By Admin | Updated: October 22, 2014 22:31 IST2014-10-22T22:31:30+5:302014-10-22T22:31:57+5:30
लासलगाव : महाग फटाक्यांनाही मागणी

दीपावलीनिमित्त बाजारपेठ गजबजली
लासलगाव : गेली पाच, सहा दिवसांपासून लासलगाव येथील विविध ठिकाणी दुकानात दीपावली सणाच्या फराळाकरिता किराणा दुकानात व कापड खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याने लासलगावची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.
दीपावलीनिमित्त येथे रोषणाई करण्यात आली आहे. समर्थ इलेक्ट्रिकचे बापू लचके यांच्याकडे चायना लाईटचे नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत व त्यांना चांगली मागणी असल्याचे सांगितले. कापड दुकानात खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भल्ला इलेक्ट्रॉनिक्स्चे काके भल्ला यांनी एलईडी एलसीडीला मागणी आहे असे सांगितले. फटाके खरेदीला १० टक्के भाववाढ झाली असली तरी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. येथे सत्तर रुपये किलो दराने शनिवारी सकाळी लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर फराळ विक्रीचा शुभारंभ सलग आठ वर्षांपासून सरपंच नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी मोतीचूर लाडू, सोनपापडी, म्हैसुरपाक, नाशिक चिवडा, मसाला शेव, चकली, शंकरपाळी, माहीम हलवा, अनारसे, मिक्स फरसाण, भावनगरी व करंजी हे दीपावली फराळ पदार्थ सत्तर रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा, रवींद्र होळकर तसेच सतीश पवार यांनी सत्तर रुपये किलो दराने मनसेच्या वतीने दीपावली सणाच्या फराळ विक्र ी सुरु झाल्यानंतर लोकांनी फराळ खरेदी करण्यासाठी रांगा लावून मिठाई गर्दी खरेदी केली. तसेच स्वर्गीय सीताराम पाटील होळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपावली सणाच्या फराळाकरीता सत्तर रुपये किलो दराने दीपावली फराळ विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. हरिओम ग्रुपचे अध्यक्ष सतीश काळे यांनी लोकांनी गेल्या पंधरा दिवसापासून प्लॉट खरेदी करण्यासाठी चांगली गर्दी केली आहे असे सांगितले. (वार्ताहर)