शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:30 PM

नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

ठळक मुद्देकडक निर्बंध : रोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प

नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार लासलगावसह अन्य बाजार समित्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर अथवा खळ्यांवर जाऊन शेतमाल विक्री करता येणार असून, त्या व्यवहारास बाजार समितीची मान्यता असणार आहे.लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सर्व शेतमालाच्या लिलावाचे कामकाज दि. १३ ते २३ मेपर्यंत पूर्णत: बंद राहणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक अडते/व्यापाऱ्यांना त्यांच्या प्लॉटवर (खळ्यांवर) जाऊन विक्री करावयाचा असेल, अशा शेतकरी बांधवांनी संबंधित अडते/व्यापारी यांच्याशी दूरध्वनी अथवा इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून आपला शेतमाल विक्री करावा, असे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दरम्यान, बाजार समित्या बंद राहणार असल्याने लासलगाव येथे प्रतिदिन तीन कोटी, चांदवड समितीचे दीड कोटी तर पिंपळगाव बाजार समितीत प्रतिदिन सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. बुधवारी (दि.१२) लासलगाव बाजार समितीत केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त कांदा लिलाव झाले. दहा हजार ४०० क्विंटल उन्हाळा कांदा ७०० ते १५५५ व सरासरी १२०० रुपये तर ५४० क्विंटल लाल कांदा ५०० ते ९९० व सरासरी ७५० रुपये भावाने विक्री झाला. पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, असे म्ह॔ंटले असले तरी कोरोना उपाययोजना होण्यासाठी हे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी मात्र या बंदला विरोध दर्शवत किमान एक दिवसाआड एका सत्रात तरी हे लिलाव घेण्याची मागणी होत आहे.शेतकऱ्यांचा लाल कांदा नाशवंत आहे. अगोदर बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामकाज बंद होत आहे. जर व्यापारी कामकाज बंद ठेवणार असतील तर सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा, अन्यथा नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवा.- भारत दिघोळे, प्रदेशाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtalukaतालुका