बाजार समितीचा फैसला सोमवारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:53 IST2017-08-12T00:53:41+5:302017-08-12T00:53:53+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर असलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणी सुरू असलेल्या प्रकरणाची शुक्रवारी (दि. ११) सुनावणी होऊन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी पुढील अंतिम सुनावणी सोमवारी (दि. १४) घेण्याचे जाहीर केले.

 Market Committee decision on Monday? | बाजार समितीचा फैसला सोमवारी?

बाजार समितीचा फैसला सोमवारी?

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर असलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणी सुरू असलेल्या प्रकरणाची शुक्रवारी (दि. ११) सुनावणी होऊन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी पुढील अंतिम सुनावणी सोमवारी (दि. १४) घेण्याचे जाहीर केले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम घेऊन जाणाºया बाजार समितीच्या तीन कर्मचाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या कर्मचाºयांवर बाजार समितीच्या वतीने कायदेशीर खर्च करण्यात आल्याबाबत सहकार खात्याने आक्षेप घेत या प्रमुख मुद्द्यासह चार मुद्द्यांवर बाजार समितीच्या सर्व संचालकांना आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी बरखास्तीच्या नोटिसा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी बजावल्या आहेत. यापूर्वी ही  सुनावणी १० जुलै व नंतर २९ जुलै व मागील गुरुवारी (दि. ३) घेण्यात आली होती.  शुक्रवारी याप्रकरणी चौथ्यांदा सुनावणी झाली. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी संचालकांच्या वतीने अ‍ॅड. विलास आंधळे व अ‍ॅड. सोनवणे यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. पुढील सुनावणी १४ आॅगस्टला ठेवण्यात आली असून, यावेळी बाजार समितीच्या संचालकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध ठेवण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सुनावणीसाठी ताराबाई माळेकर वगळता बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती संजय तुंगार, संचालक शंकरराव धनवटे, दिलीप थेटे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संदीप पाटील, श्याम गावित, रवि भोये यांच्यासह सोळा संचालक उपस्थित होते.

Web Title:  Market Committee decision on Monday?