बाजार समिती उद्या बंद

By Admin | Updated: September 23, 2016 00:36 IST2016-09-23T00:35:43+5:302016-09-23T00:36:27+5:30

चांदवड : मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Market Committee closes tomorrow | बाजार समिती उद्या बंद

बाजार समिती उद्या बंद

 चांदवड : मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले असून, यासाठी बाजार समिती उद्या शनिवारी बंद राहणार आहे़
या मूक मोर्चासाठी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून, गावागावांतून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण दिवसभर नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांतून मोर्चासाठी वाहनांची वर्दळ असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे. चांदवड ही बाजारपेठ मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाकरिता जाण्यास व येण्यास या मार्गाचा जास्तीत जास्त वापर होणार आहे. इतर जिल्ह्यांतून येणारे मालवाहतूक ट्रक, कंटेनर आदिंचे मार्ग बदलण्यात येणार आहेत किंवा वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचा शेतमाल विक्रीस आणताना नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतमालाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वेळीच लिलाव होणे शक्य नाही. बाजार समितीच्या सर्व संबंधित घटकांनाही मोर्चात सहभागी व्हायचे आहे. त्याकरिता त्यांनी लिलाव बंद ठेवण्याची लेखी मागणी बाजार समितीकडे केल्याने शनिवारी (दि. २४) चांदवड मुख्य बाजार आवार, उपबाजार आवार, वडनेरभैरव व शेतमाल खरेदी-विक्री केंद्र, रायपूर येथील सर्व शेतमालाचे लिलाव बंद राहतील. शेतकऱ्यांनी शनिवारी शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन सभापती आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर व संचालक मंडळाने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Market Committee closes tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.