माहेरून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:03 AM2020-09-10T00:03:37+5:302020-09-10T01:16:41+5:30

नाशिक : पतीला हॉटेल टाकण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणून दिले नाही, म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार शारीरिक-मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.

Marital harassment for not bringing money from Maher | माहेरून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ

माहेरून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ

Next
ठळक मुद्देमुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पतीला हॉटेल टाकण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणून दिले नाही, म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार शारीरिक-मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. तसेच मामे सासऱ्याकडून अश्लील शिवीगाळ व स्री मनास लज्जा उत्पन्न करणारे कृत्य घडल्याने त्यांच्याविरुद्ध पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा व पती तुषार सुधाकर दुसाने (३१, रा. इंदिरानगर) याच्यासह सासरच्या सहा लोकांविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२०१७साली पीडित विवाहितेचे तुषार दुसाने यांच्यासोबत लग्न झाले. तेव्हापासून वेळोवेळी सासरच्या लोकांनी माहेरून दागिने,
गृहोपयोगी वस्तू तसेच हॉटेलसाठी सात लाख रुपये आणून देण्याची मागणी होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास
सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

Web Title: Marital harassment for not bringing money from Maher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.