मराठी साहित्य प्रचार परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:43+5:302021-09-06T04:17:43+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत उपस्थित होते. याप्रसंगी परिषदेतर्फे विष्णू अत्रे, सुभाष ...

मराठी साहित्य प्रचार परिषद
प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत उपस्थित होते. याप्रसंगी परिषदेतर्फे विष्णू अत्रे, सुभाष पानगव्हाणे, रमेश कदम, संजय कोंटुरवार आदी शिक्षक व अध्यापक यांचा पुस्तक, लेखणी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी प्रास्तविकात शिक्षक दिनाचे महत्त्व व परिषदेचे कार्य व उद्दिष्टे यांचा परिचय करून दिला. भगत यांनी मार्गदर्शन केले. विष्णू अत्रे, डॉ. बी. पी. चौधरी, गणेश शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. नंदकिशोर सोनवणे, सुरेश पुंड, दिलीप लड्डा, गणपत शिंदे, बाळासाहेब कदम, दिलीप चौधरी, देवीदास भारती, शिवाजी पाटील, मनोज कावळे, नानासाहेब मंडलिक, प्रशांत अक्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश उगले यांनी तर एस. टी. पानगव्हाणे यांनी आभार मानले.
फोटो - ०५ ओझरटाऊनशिप१
ओझर येथे शिक्षक दिन कार्यक्रमात बोलताना साहित्य प्रचार सभेचे अध्यक्ष किशोर कदम. समवेत विष्णू अत्रे आदी.
050921\05nsk_10_05092021_13.jpg
ओझर येथे शिक्षक दिन कार्यक्रमात बोलताना साहित्य प्रचार सभेचे अध्यक्ष किशोर कदम. समवेत विष्णू अत्रे आदी.