Marathi Language Pride Day at Manmad College | मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

मनमाड महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य बी. एस. जगदाळे. समवेत आंबेकर, ज्योती बोडके, एस. डी. राजवाळ आदी.

ठळक मुद्देसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन.

मनमाड : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या ज्योती बोडके, व्ही. आर. फंड, प्रा. जे. के देसले यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
उज्ज्वला होन, तृप्ती मोरे, स्नेहा शेजवळ, अनुष्का कुलकर्णी या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. डॉ. जगदाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कविवर्य शिरवाडकर यांचा जीवनपरिचय करून देत मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रास्ताविक प्रा. अमोल देसले, सूत्रसंचालन प्रा.एस.डी.राजवाळ तर प्रा. पी. व्ही. आहिरे यांनी आभार मानले.
 

Web Title: Marathi Language Pride Day at Manmad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.