मराठा क्रती मोर्चास माळी समाजाचा पाठिंबा
By Admin | Updated: September 22, 2016 00:37 IST2016-09-22T00:37:36+5:302016-09-22T00:37:56+5:30
मराठा क्रती मोर्चास माळी समाजाचा पाठिंबा

मराठा क्रती मोर्चास माळी समाजाचा पाठिंबा
नामपूर : बागलाण तालुक्यातील अंबासन येथील सावता चौकात माळी समाजबांधवांची बैठक संपन्न झाली. प्रारंभी शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीदरम्यान, नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चास पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष केदा भामरे, ज्येष्ठ नेते खेमराज कोर, बाजार समितीचे संचालक चंद्रकांत कोर, शैलेंद्र कोर, पंढरीनाथ अहिरे, शशिकांत कोर, सरपंच रवींद्र कोर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मार्चासंदर्भात चर्चा करण्यात आली. गावातून किमान दोन हजार नागरिक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या दिवशी अंबासन गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी मराठा, माळी व आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)