शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

Maharashtra Bandh : नाशिकमध्ये महिला आंदोलकांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 16:19 IST

मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुत्र आता महिलांनी हाती घेत शुक्रवारी (27 जुलै) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बानेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकार विरोधात निषेध नोंदवला.

नाशिक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू असताना प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आंदोलन करू नये यासाठी नोटिसा पाठविल्याने नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी आंदोलनात पुढाकार घेत आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यापुढे नाशिक जिल्हयात आंदोलनाचे नेतृत्व महिला सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी महिलांनी गोदावरी परिसरात आंदोलन करीत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

आंदोलकांना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे आंदोलकांनी सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात ठाण मांडून आंदोलनास सुरुवात केली. येथेही केवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्रवारपासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असून आंदोलन करण्यासाठी प्रशासन जागा देत नाही, आता कुठे आंदोलन सुरू आहे ते शोधा असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या माधवी पाटील व पूजा धूमाळ या महिलांनी गोदावरीच्या पात्रात उतरून आंदोलनक केले तर अस्मिता देशमाने आणि मंगला शिंदे या महिलांनी बानेश्वराला दुग्धाभिषेक करीत सरकार विरोधात घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी केली. 

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाने गोदावरी  पात्रात  उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानंतर अशा प्रकारे मराठा आंदोलकांनी पाण्यात उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये शुक्रवारी महिला आंदोलकांनी पाण्यात उतरून आंदोलन केल्याने प्रशासनासमोर आंदोलकांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदNashikनाशिक