मरळगोई खुर्द सरपंचपदी थोरे
By Admin | Updated: July 27, 2014 00:20 IST2014-07-26T20:35:16+5:302014-07-27T00:20:23+5:30
मरळगोई खुर्द सरपंचपदी थोरे

मरळगोई खुर्द सरपंचपदी थोरे
लासलगाव : निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल सुदामराव थोरे, तर उपसरपंचपदी गणेश दत्तू फापाळे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सभागृहात सकाळी १० वाजेपासून मंडल अधिकारी धाकराव, तलाठी कमोद, ग्रामविकासचे पठारे यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. त्यात सरपंचपदासाठी अमोल सुदाम थोरे, तर उपसरपंचपदासाठी गणेश दत्तू फापाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी के. डी. धाकराव यांनी घोेषित केले. ही निवड बिनविरोध होण्यासाठी मरळगोईचे माजी सरपंच सुदामराव थोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, पांडुरंग आव्हाड, बाबूराव घुगे, अरुण फापाळे, रामचंद्र धात्रक, नारायण फापाळे, दलितचंद फापाळे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)