यंदाच्या निवडणुकीत अनेकांची अनामत जप्त
By Admin | Updated: October 22, 2014 22:49 IST2014-10-22T22:48:11+5:302014-10-22T22:49:28+5:30
विधासभा : मालेगाव बाह्य मतदारसंघाची परंपरा कायम

यंदाच्या निवडणुकीत अनेकांची अनामत जप्त
प्रवीण साळुंके ल्ल मालेगाव
येथील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या १० पैकी विजयी उमेदवारांव्यतिरिक्त २ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली असून, बाकीच्या ७ उमेदवारांची जप्त झाली आहे.
२००९ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दाभाडी विधानसभा मतदारंसघाचे थोड्याफार फरकाने नव्याने नामकरण मालेगाव बाह्य मतदारसंघ असे झाले. या मतदारसंघात अनेक परंपरा असून, त्यातील अनेक काही परंपरा पूर्वीच्या दाभाडी मतदारसंघातही होत्या. त्यातील एक परंपरा म्हणजे पराभूत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याची आहे. यंदाच्या निवडणुकीत विधानसभेसाठी १० जणांनी नशिब अजमावले. विद्यमान आमदारांनी या सर्वांवर मात करत विजय मिळविला. त्यामुळे यातील सात उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमाविण्याची नामुष्की आली. यात देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉँगे्रसच्या उमेदवाराचा समावेश असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सलग दोन्ही निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरविले मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांना आपल्या उमेदवाराची अनामत रक्कम गमाविण्याची वेळ आली. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत दोन पराभूत उमेदवारांना स्वत:ची अनामत रक्कम वाचविण्यात यश आले. गेल्या निवडणुकीत फक्त एका उमेदवाराची अनामत रक्कम वाचली होती.
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाह्य मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील पराभूतांमध्ये १७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. ही परंपरा पूर्वीच्या दाभाडी विधानसभा मतदारसंघातही सुरू
होती.
मतदारसंघाचा इतिहास बघता निवडणुकीत १९८५ सालापासून, झालेल्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत पराभूतांपैकी एक किंवा दोन जणांची सोडल्यास इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. याला अपवाद १९९९ ची विधानसभा निवडणुक ठरली होती. या निवडणुकीत पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी दोघांची अनामत रक्कम वाचली होती तर दोघांची जप्त झाली होती.