‘मेक इन महाराष्ट्र’साठी आता अनेक सवलती

By Admin | Updated: April 25, 2015 01:22 IST2015-04-25T01:21:33+5:302015-04-25T01:22:01+5:30

‘मेक इन महाराष्ट्र’साठी आता अनेक सवलती

Many concessions now for 'Make in Maharashtra' | ‘मेक इन महाराष्ट्र’साठी आता अनेक सवलती

‘मेक इन महाराष्ट्र’साठी आता अनेक सवलती

  नाशिक : लघु आणि मध्यम उद्योगातूनच स्थानिक युवकांना बेरोजगार मिळतो. त्यामुळे या उद्योगांसाठी शासन खास धोरण तयार करीत असून, येत्या ९ मे रोजी मुंबईत हे धोरण जाहीर केले जाईल, अशी घोेषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून, त्यामुळे उद्योगांना सवलतीचे धोरण जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नदीपात्रालगत कारखाने उभारणीसाठी असलेल्या नियंत्रणाचा कायदाच कॅबिनेटच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे. तसेच केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्यातून औद्योगिक महामंडळाला वगळण्यात आले असून, दोन वर्षांपासून ठप्प असलेल्या भूखंड आरक्षणाच्या अधिसूचनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या उद्योजकांसाठी आयोजित बाराव्या निमा इंडेक्स २०१५ या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवारी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मोठ्या उद्योगांपेक्षा लघुउद्योजक महत्त्वाचे आहेत. मोठ्या उद्योगांना आधार ठरणाऱ्या या उद्योगांमधून रोजगारासाठी पात्र-अपात्र व्यक्तींना मोठी संधी मिळत असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. त्यामुळे येत्या ९ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योग संघटनांंची बैठक बोलावण्यात आली असून, त्यांच्यासमोरच नव्या धोरणाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Many concessions now for 'Make in Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.