शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मंजुरीची अनेक प्रकरणे रिजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:10 IST

महापालिकेने आॅटो डिसीआर प्रणालीच्या माध्यमातून बांधकामासाठी मंजुरीसाठी फाइली सादर करण्याची अट घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात फाइलींची पेंडेन्सी वाढली होती. ३१ मेच्या आत तिचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. मात्र नगररचना विभागाने निपटारा करण्याच्या घाईमध्ये बहुतांशी फाइली रिजेक्ट केल्याने विकासक आणि वास्तुविशारद बुचकळ्यात पडले आहेत.

नाशिक : महापालिकेने आॅटो डिसीआर प्रणालीच्या माध्यमातून बांधकामासाठी मंजुरीसाठी फाइली सादर करण्याची अट घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात फाइलींची पेंडेन्सी वाढली होती. ३१ मेच्या आत तिचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. मात्र नगररचना विभागाने निपटारा करण्याच्या घाईमध्ये बहुतांशी फाइली रिजेक्ट केल्याने विकासक आणि वास्तुविशारद बुचकळ्यात पडले आहेत.  विशेष म्हणजे एकदा प्रकरण आॅटो डिसीआरमध्ये सादर केल्यानंतर स्क्रुटीनी शुल्क म्हणून दहा हजार रुपये भरावे लागते आणि दुसऱ्यावेळी साडेसहा हजार रुपये भरावे लागतात. त्यामुळे नाहक दुसºयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय रिजेक्ट प्रकरण झाल्याने संबंधित जागामालक आणि विकासकांच्या रोषालाही बळी पडावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून आॅटो डिसीआर वापरण्यावरून महापालिका आणि विकासक-वास्तुविशारद यांच्यात संघर्ष सुरू आहे. सदरचे सॉफ्टवेअर अडचणीचे असून, त्यात प्रस्ताव सादर करणे अत्यंत अडचणीचे होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यापूर्वी या सॉफ्टवेअरच्या वापरावरून विकासक आणिवास्तुविशारदांनी महापालिकेला आव्हानही दिले होते. त्यावर महापालिकेने प्रात्याक्षिके सादर केली, परंतु अधिकाºयांचीदेखील दमछाक झाली होती. नगररचना विभागात फाइली सादर केल्यानंतर ती मंजूर होण्यास प्रचंड विलंब होत असून, त्यामुळे मध्यंतरी एका तारांकित हॉटेलमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमवेत आयोजित बैठकीत त्यावर चर्चा झाली होती. विशेषत: फाइली पेंडिंग असल्याबाबत तक्रारी होत्या. त्याची दखल घेत आयुक्तांनी संबंधितांना ३१पर्यंत फाइलींचा निपटारा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र नगररचना विभागाने फाइली रिजेक्ट करून निपटारा केल्याचे विकासक आणि वास्तुविशारदांचे म्हणणे आहे.  फाइली नाकारण्याच्या प्रकारानंतर पुन्हा दुरुस्ती करून पुन्हा स्क्रुटीनीसाठी शुल्क भरून प्रकरण दाखल करावे लागत आहे. त्यामुळे आधी दहा हजार आणि नंतर साडेसहा हजार असा भुर्दंड भरावा लागत आहे. फाइली का नाकारल्या जातात याबाबत ठेकेदारांना उत्तरे देताना वास्तुविशारदांना नाकीनव येत असून, जागा मालकाकडून किती वेळा स्क्रुटीनी फी मागणार, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.े महापालिकेचा आॅटो डिसीआर महागडामहापालिकेच्या आॅटो डिसीआर खरेदी करण्याची अनेकांची तयारी असली तरी बाजारात मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे सॉफ्ट वेअर जास्तीत जास्त सहा ते सात हजार रुपयांना असताना महापालिका सध्या वापरत असलेला आॅटो डिसीआर वापरण्यासाठी पंधरा हजार रुपये मोजावे लागत असल्याचेही काही वास्तुविशारदांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका