व्हॉट्स अॅप मिश्किलीने उडविली अनेकांची टोपी
By Admin | Updated: September 29, 2014 00:27 IST2014-09-29T00:27:02+5:302014-09-29T00:27:13+5:30
व्हॉट्स अॅप मिश्किलीने उडविली अनेकांची टोपी

व्हॉट्स अॅप मिश्किलीने उडविली अनेकांची टोपी
नाशिक : सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात दिवसभर वैचारिक माऱ्याने शिणलेल्या श्रोत्यांना व्हॉट्स अॅप मिश्किली या कार्यक्रमाने ताजेतवाने केले. रंगतदार ठरलेल्या या कार्यक्रमात अनेकांच्या टोप्या उडाल्या. कवी किशोर पाठक व कवी नरेश महाजन यांनी या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली.
मेळाव्यात व्हॉट्स अॅप मिश्किली या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद नोंदविला. अनेकांनी टीकाटिपणीच्या माध्यमातून आपले हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला; परंतु ज्याच्यावर मिश्किली पडली त्यानेही खिलाडूवृत्ती दाखविल्याने कार्यक्रम रंगतदार ठरला. चंद्रकांत महामिने, मिलिंद जहागीरदार, किशोर पाठक, नरेश महाजन, अपर्णा वेलणकर, सदानंद जोशी, नंदन रहाणे, विलास औरंगाबादकर, वृंदा भार्गवे, रमेश जुन्नरे, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जातेगावकर, स्वानंद बेदरकर यांच्यापासून ते वाचनालयाच्या कर्मचारी शोभना वैद्य यांच्यापर्यंत टिपणी करणाऱ्या या कार्यक्रमाने आगळावेगळा आनंद श्रोत्यांना दिला. त्यानंतर नंदन रहाणे यांचा ‘आठवणींची चाळता पाने’ हा कार्यक्रम झाला, तर पिस्तुल्या, लपंडाव आणि प्रिंटेड रेनबो या लघुचित्रफिती रघुनाथ फडणीस
यांनी सादर करत मेळाव्याचा समारोप केला. (प्रतिनिधी)