जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:25 AM2020-07-04T00:25:34+5:302020-07-04T00:50:22+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 

As many as 13 corona victims in 24 hours in the district | जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी

जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी

Next
ठळक मुद्देसंकट वाढले : दिवसभरात २९५ नवे बाधित

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 
महानगरात शुक्रवारी १८९ बाधित आढळून आले. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ९१वर पोहोचल्याने एकूण बाधितांचा आकडा थेट ४८६४वर पोहोचला आहे. महानगरात पुन्हा एकदा बाधितांच्या आकड्याने दोनशेनजीकचा पल्ला गाठला. गत महिनाभरात महानगरातील बाधितांचा आकडा शंभरीपार पोहोचण्याची ही बारावी वेळ आहे. महानगरातील नऊ बाधितांव्यतिरिक्त चार मृतांमध्ये दोन व्यक्ती मालेगावच्या आहे. पेठ, धुळ्याच्या महिलेचा देखील त्यात समावेश आहे. शुक्रवारी मनपा रुग्णालयांमध्ये ४१८, तर ग्रामीणला १७८, जिल्हा रुग्णालयात १९, मेडिकल कॉलेजला ६, मालेगाव ११, तर गृहविलगीकरण कक्षात मिळून ६५० नवीन रुग्ण दाखल झाले.
पेठमध्ये दोन रुग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यात आता एकमेव सुरगाणा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. पेठमध्ये आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 
मालेगाव शहरातील ११५ जणांच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
दिंडोरी तालुक्यात गुरुवारी १४  अहवालापैकी वरखेडा येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ओझर शहरात  शुक्र वारी (दि.३) दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
लासलगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या चार झाली आहे.

Web Title: As many as 13 corona victims in 24 hours in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.