कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती ... सटाणा : बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 05:38 PM2019-12-11T17:38:59+5:302019-12-11T17:39:31+5:30

सटाणा : शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचºयापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात प्रारंभ झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचºयाच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

 Manufacturing of waste from waste ... Satana: Inauguration of biomaining project | कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती ... सटाणा : बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन

सटाणा येथील पालिकेतर्फे कार्यान्वित करण्यात आलेल्या बायोमाइनिंग प्रकल्पाचे उद्घाटन करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष मुन्ना शेख, सुरेखा बच्छाव, पुष्पाताई सूर्यवंशी, भारती सूर्यवंशी, संगीता देवरे आदी.

Next


सटाणा : शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचºयापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात प्रारंभ झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचºयाच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. संकलित कचºयावर प्रक्रि या होऊन त्याची विल्हेवाट लागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला असून, शहरवासीयांनीही आत्ता घरोघरी कचºयाचे वर्गीकरण करून घंटागाडीचा वापर कटाक्षाने करावा. या बळावर शहर लवकरच स्वच्छतेबाबत लवकरच राष्ट्रीय पातळीवरील थ्री स्टार मानांकन प्राप्त करेल, असा आत्मविश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष मोरे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या तीन वर्षात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता नगर परिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. या प्रकल्पातून पस्तीस हजार टन कचºयाचे बायोमिनिंग होणार असून, गेल्या पन्नास वर्षापासून साठून राहिलेल्या कचºयाची येत्या सहा महिन्यात विल्हेवाट लागणार आहे. या प्रकल्पातून कचºयापासून खतनिर्मिती होणार असून, यापूर्वीच्या संपूर्ण कचºयाची विल्हेवाट लागल्यानंतर नगर परिषदेच्या मालकीची पाच एकर जमीन मोकळी होणार असल्याचेही नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. असा प्रकल्प राबविणारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगर परिषद ही पहिलीच असून, जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प एआर एनर्जी लिमिटेड मुंबई या कंपनीच्या सहकार्याने प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहर स्वच्छतेसाठी मोलाचा हातभार लागणार असून, शहरवासीयांनीही आता पुढे येऊन शहर स्वच्छतेशी संबंधित आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही मोरे यांनी केले. यावेळी उद्घाटक आमदार दिलीप बोरसे यांनी नगर परिषदेच्या कामकाजाबाबत कौतुक करून शहरवासीयांच्या सेवा सुविधांसाठी शासन स्तरावरून सदैव सहकार्य प्राप्त करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. कार्यक्र मासाठी उपनगराध्यक्ष मुन्ना शेख, गटनेते राकेश खैरनार, आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, सभापती पुष्पाताई सूर्यवंशी, भारती सूर्यवंशी, संगीता देवरे, उपसभापती निर्मला भदाणे, नगरसेवक दीपक पाकळे, नितीन सोनवणे, राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर, दत्तू बैताडे, शिवाजी सोनवणे, आरोग्य निरीक्षक माणिक वानखेडे, शालिग्राम कोर, किशोर सोनवणे, शिवाजी सोनवणे आदींसह शहरवासीय उपस्थित होते.
 

Web Title:  Manufacturing of waste from waste ... Satana: Inauguration of biomaining project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.