महंत ग्यानदासांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: September 8, 2016 01:32 IST2016-09-08T01:32:39+5:302016-09-08T01:32:50+5:30

न्यायालयाचे आदेश : पंचवटी पोलीस ठाण्यात होणार गुन्हा दाखल

Mantranghanga's offense against Mahant Gyandas | महंत ग्यानदासांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

महंत ग्यानदासांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

 नाशिक : रामकुंडावर १४ जुलै रोजी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी महादेव वैकुंठधाम मुक्तीद्वार (परी)आखाड्याच्या पीठाधिश्वर त्रिकाल भवंता यांच्याकडून माईक हिसकावून घेत त्यांना बोलण्यास विरोध केला होता़ याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने भवंता यांनी महंत ग्यानदासांविरोधात न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़ या दाव्याची दखल घेत न्यायालयाने महंत ग्यानदास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंचवटी पोलिसांना दिले आहेत़
सिंहस्थ ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामकुंडावरील भव्य स्टेजवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी भवंता यांनी माईक हातात घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला असता महंत ग्यानदास यांनी आक्षेप घेतला़ यावेळी महंत ग्यानदास यांनी माईक हिसकावून विनयभंग केल्याचा आरोप भवंता यांनी करून पंचवटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही केली होती़
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मंत्रिगणही या तक्रारीची दखल घेत नसल्याने भवंता यांची अ‍ॅड़ मंदार भानोसे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता़ यामध्ये प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी महंत ग्यानदास यांच्या विरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Mantranghanga's offense against Mahant Gyandas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.